नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बेचेंद्रमोदी सुटाबुटातील मित्रासोबत देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विकत आहेत, असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
'बेचेंद्रमोदी सुटाबुटातील मित्रासोबत विकतोय देशातील सार्वजनिक कंपन्या', राहुल गांधींचा मोदीवर हल्लाबोल - मोदींचे सुटाबुटातील मित्र
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
'बेचेंद्रमोदी सुटाबुटातील मित्रासोबत देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विकत आहेत. ज्याला देशाने अनेक वर्ष मेहनत करून मोठे केले. देशातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱया लाखो कर्मचाऱ्यासाठी भिती आणि अनिश्चिततेची वेळ आहे. मी या लुबाडीच्या विरोधात त्या लाखो कर्मचाऱ्यांसोबत खाद्यांशी खांदा लावून उभा आहे', असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी एक कार्टूनही शेअर केले आहे.
दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील यवतमाळ येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी मोदींची तूलना पाकिटमारांशी केली होती. मोदी हे अंबानी व अदाणीचे लाउडस्पीकर असून त्यांची निती ही एका पाकिटमारासारखी झाली आहे. पाकिटमार चोरी करण्यापुर्वी लोकांचे लक्ष विचलीत करतो, असे राहुल म्हणाले होते.