महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नमस्ते  ट्रम्प...! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर, अहमदाबादमध्ये जय्यत तयारी - डोनाल्ड ट्रम्प भारत दौरा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प, जावई जॅरेड कुशनर यांच्यासह भारत भेटीवर येत आहेत. भारत दौऱ्यासाठी ट्रम्प आपल्या सहकाऱ्यासोबत वॉशिंग्टनहून रवाना झाले आहेत.

us-president-trump-visits-india-today
us-president-trump-visits-india-today

By

Published : Feb 24, 2020, 7:35 AM IST

Updated : Feb 24, 2020, 8:05 AM IST

अहमदाबाद-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज (सोमवारपासून) 36 तासांसाठी भारतभेटीवर येत आहेत. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया याही येत आहेत. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरुन निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर

अहमदाबादमध्ये होणारा मोदी व ट्रम्प यांचा रोड शो व त्यानंतर मोटेरा स्टेडियममध्ये होणारा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम हे दौऱ्याचे आकर्षण असणार आहे. त्यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांचा ताफा जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा‘नमस्ते ट्रम्प’! अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Last Updated : Feb 24, 2020, 8:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details