महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दोन्ही देश तयार असतील तरच काश्मीर प्रश्नी करणार मध्यस्थी - ट्रम्प

जर भारत पाकिस्तान दोन्ही देश तयार असतील तरच काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प

By

Published : Sep 24, 2019, 8:42 AM IST

Updated : Sep 24, 2019, 10:03 AM IST

न्युयॉर्क- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल (सोमवार) चर्चा झाली. काश्मीर मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागत फिरणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडघशी पडण्याची वेळ आली. काश्मीर मुद्दा भारत आणि पाकिस्तानने मिळून सोडवायला हवा, तसेच भारतासोबत आपले मैत्रीपूर्ण संबध आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

काश्मीर मुद्द्यावर नक्कीच भारत पाकिस्तान बरोबर येतील. जर भारत पाकिस्तान दोन्ही देश तयार असतील तरच काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले. हा एक क्लिष्ट प्रश्न असून दोघांनाही यावर चर्चा करावी लागेल, असे ट्रम्प म्हणाले.

मी चागंल्या प्रकारे मध्यस्थी करु शकतो. मात्र, त्यासाठी आधी दोन्ही देश चर्चेसाठी तयार हवे, असे ट्रम्प म्हणाले. याआधीही अनेक वेळा ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानशी मध्यस्थी करण्याबाबत वक्तव्य केले आहे, मात्र, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून अमेरिकेने मध्यस्थी करण्याची गरज नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच जरी या प्रश्नी चर्चेची गरज पडली तरी ती फक्त पाकिस्तानशी केली जाईल, असेही भारताने स्पष्ट केले आहे.

इम्रान यांच्या बरोबर झालेल्या भेटीदरम्यानच ट्रम्प यांनी हाऊडी मोदी कार्यक्रमाची प्रशंसा केली. तसेच एका पाकिस्तानी पत्रकाराने काश्मीरमधील मानवाधिकार उल्लघंनाबाबात प्रश्न विचारला असता ट्रम्प भडकले, असले पत्रकार तुम्ही कोठून शोधून आणता, असे ट्रम्प म्हणाले.

Last Updated : Sep 24, 2019, 10:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details