महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हामजा बिन लादेन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना 'अल कायदा'चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाल्याची माहिती दिली आहे.

हामजा बिन लादेन

By

Published : Sep 14, 2019, 7:26 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना 'अल कायदा'चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाल्याची माहिती दिली आहे. अफगाणीस्तान-पाकिस्तान सिमारेषेवर झालेल्या गोळीबारीमध्ये हमजा ठार झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


हमजा हा ओसामाच्या २० मुलांपैकी तिसऱ्या पत्नीचा १५ वा मुलगा असून तो ३० वर्षांचा होता. ओसामा बिन लादेन याला ठार केल्यानंतर अल-कायदाची सूत्रे त्याच्याकडे होती. ओसामाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हमजा अमेरिका आणि अन्य देशांवर हल्ले करण्याची शक्यता होती. त्यामुळे हमजावर अमेरिकेने तब्बल १ लाख डॉलरचे इमान जाहीर केले होते. यापुर्वी आगस्ट महिन्यात हमजा बिन लादेन हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांनी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details