कॅरी (अमेरिका) -कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या अन्यायकारक मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. कॅरी शहरातील उत्तर कॅरोलिना भागात ख्रिश्चन धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना आणि पदयात्रा काढली होती. पदयात्रेच्या समारोपावेळी संबंधीत भागातील पोलिसांनी आंदोलक आणि ख्रिश्चन धर्मगुरूंचे पाय धुवून नमस्कार केला. या प्रसंगाला कॅरीचे हंगामी महापौर लोरी बुश यांनी ट्वीट करून दुजोरा दिला आहे. हा एक मार्मिक क्षण असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
इतरांचे पाय धुणे हे ख्रिश्चन धर्मामध्ये माणूसकीची उपासना असल्याचे सांंगितलेे आहे. त्यामुळे पोलिसांनी गुडघ्यावर बसून धर्मगुरुंचे पाय धुतले.