अफगाणिस्तानच्या सलोख्यासाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी झल्माय खलीलजाद यांनी नुकताच नवी दिल्ली येथे एक छोटासा ‘तातडीचा’ दौरा केला. यांच्या या दौऱ्याच्या एक दिवसानंतर सूत्रांनी असे सांगितले की, अफगाणिस्तान सारख्या युद्धग्रस्त देशाच्या अंतर्गत राजकीय प्रक्रियेत भारताने मोठी भूमिका निभावावी यासाठी अमेरिका उत्सुक आहे. त्यामुळे तातडीची गरज असल्याने ते भारतात चर्चेसाठी आले होते. ते (खलीलजाद) नंतरही येऊ शकले असते, परंतु त्यांना काही तासच बोलणी करायची होती. त्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबला. असे खलीलजाद यांची परराष्ट्रमंत्री (ईएएम) डॉ. एस. जयशंकर, अजित डोभाल (एनएसए) आणि परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांच्याशी झालेल्या बैठकीबद्दल सांगताना सुत्रांनी ही माहिती दिली.
भारत हा नेहमीच तालिबान आणि पाकिस्तान यांच्याशी चर्चा करण्यासाठी फारसा उत्सुक नसतो. तालिबानींमध्ये चांगला किंवा वाईट असा कसलाही भेदभाव केला जाऊ नये, याविषयी भारताने आतापर्यंत उघडपणे आणि अधिकृत भूमीका घेतली आहे. परंतु आता तालिबानसह अफगाणिस्तानच्या अंतर्गत राजकीय घडामोडींकडे भारताने बारकाईने लक्ष द्यावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे. असेही सुत्रांनी सांगितले.
“परराष्ट्र मंत्रालय आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सी यांच्या दरम्यान झालेल्या संभाषणांत... अंतर्गत घडामोडी, सुरक्षाविषयक घडामोडी, यूएस -तालिबान चर्चेचा परिणाम इत्यादी अफगाणिस्तानच्या राजकीय भूमीकांवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या बाबतीच्या प्रस्तावाबद्दल बालणी झाली. अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वरिष्ठ संचालक लिसा कर्टिस यांच्यासमवेत खलीलजाद यांनी दोहा येथे मुल्ला बरदार व टीमची भेट घेवून ते इस्लामाबादमार्गे दिल्लीला आले होते. सध्या अफगाणिस्तानसह जगातील इतर अनेक देश कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटाशी लढा देत आहेत. अशावेळी अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन मात्र अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्यांवर आणि सैन्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविषयी तालिबानशी पून्हा जलदगतीने वाटाघाटी सुरु करण्यासाठी उत्सुक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादाचा अफगाणिस्तानला असणारा धोका, संरक्षण दलांवर तालिबानांकडून होणारे हल्ले, या घटनांचा अफगाणिस्तानच्या घटनात्मक घटकासोबतच तेथिल सरकारवर, सुरक्षा दले आणि समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामाबद्दल खलीलजाद यांनी चर्चेत सहभागी असलेल्या भारतीय प्रतिनिधींना याबद्दलची अद्ययावत माहिती दिली.’