हैदराबाद - अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोव्हीड -19 च्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि क्लोरोक्विनच्या दुष्परिणामांविषयी दुष्परिणामांबद्दल ड्रग सेफ्टी कम्युनिकेशन जारी केले आहे. त्यानुसार, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन सल्फेटसारखी औषधे एफडीए-मान्यताप्राप्त असून त्या मलेरियासारख्या आजारांवरील उपचारासाठी उपयोगात आणल्या जातात. त्याचप्रकारे या औषधीला ल्युपस आणि संधिवातासारख्या आजारावरील उपचारासाठीदेखील एफडीएकडून मान्यता आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या रुग्णावरील उपचारासाठी या औषधीचा वापर करण्यास एफडीएकडून परवानगी किंवा मान्यता नाही.
याबाबत माहिती देताना, एफडीएचे आयुक्त स्टीफन एम. हॅन म्हणाले, 'आम्ही आमच्या रुग्णासाठी शक्य ती उपचार पद्धती शोधत आहोत. तसेच त्यांना योग्य त्या सुविधा प्रदान करत आहोत आणि त्यांच्या आरोग्यानुसार जी कुठली औषधी त्यांच्यावर उपायकारक ठरेल याबाबत आम्ही आवश्यक ती माहिती घेऊन त्यानुसार उपचार करण्याचा निर्णय घेऊ.' दरम्यान, कोरोनावरील उपचारासाठी या औषधींचा वापर करण्याआधी आम्ही, त्या औषधाच्या काही वैद्यकीय चाचण्या करुन घेतल्या. तेव्हा या औषधींच्या काही दुष्परिणामदेखील निदर्शनास आले. त्यानुसारच ही औषधी कोरोनावरील उपचारासाठी सुरक्षित किंवा योग्य नसल्याचे आम्ही निश्चित करणार आहोत.