नवी दिल्ली - ज्येष्ठ भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनावर अमेरिकेच्या दुतावास कार्यायलाने दु:ख व्यक्त केले आहे. भारत-अमेरिका संबध सुधारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता, असे अमेरिकेच्या दुतावास कार्यालयाने ट्विटरवरुन दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
भारत-अमेरिका संबध सुधारण्यात स्वराज यांचा मोलाचा वाटा - अमेरिका दुतावास कार्यालय
भारत-अमेरिका संबध सुधारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता, असे अमेरिकेच्या दुतावास कार्यालयाने ट्विटरवरुन दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
सुषमा स्वराज भारतात आणि परदेशात खूप चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्या होत्या. त्या भारताच्या सर्वोत्तम प्रतिनिधी होत्या. २०१८ साली अमेरिका आणि भारतामध्ये मंत्री स्तरावर चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या एक दृढ नेत्या होत्या, असे अमेरिकेच्या दुतावास कार्यालयाने म्हटले आहे.
माजी परराष्ट्र मंत्री तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरु आहे.