हैदराबाद - अमेरिकेचे कौन्सिल जनरल जोएल रीफमॅन यांनी ईनाडू ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांची रामोजी फिल्म सिटी येथे भेट घेतली. रामोजी राव यांच्या यशस्वी मिडिया प्रवासामागील रहस्य जाणून घेण्यासाठी रीफमॅन उत्सुक होते. राव यांनी यावेळी जनरल यांना इनाडू, ईटीव्ही, रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही भारत यांच्याविषयी माहिती दिली.
ईनाडू ग्रुप करत असलेल्या कामांनी रीफमॅन प्रभावित झाले होते. रोमोजी राव प्रत्येक कामात वैयक्तिकरित्या इतका रस घेत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. यानंतर रिफमॅन, सार्वजनिक व्यवहार अधिकारी ड्र्यू गिब्लिन आणि मीडिया सल्लागार मोहम्मद बासिथ यांनी ईटीव्ही भारत स्टुडिओला भेट दिली.