नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना विषाणू बाधीत रुग्णाची संख्या 81 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फक्त महत्त्वाच्या खटल्यावरच सुनावणी होणार असल्याचे आज न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच न्यायालयात सुनावणीदरम्यान संबधित लोकांशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
कोरोना विषाणू दहशत : सर्वोच्च न्यायालयात होणार फक्त महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी - SC OVER CORONAVIRUS
जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध घटकांवरही याचे परिणाम झाले आहेत. महत्त्वाच्या खटल्यावरच सुनावणी होणार असल्याचे आज न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा पहिला बळीही कर्नाटकात गेला असून अनेक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकराने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सर्व राज्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या नंबरवरुन नागरिकांना कोणत्याही मदतीसाठी फोन करता येणार आहे. ०११ - २३९७८०४६ हा क्रमांक केंद्र सरकारने जारी केला आहे.
जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध घटकांवरही याचे परिणाम झाले आहेत. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये कोरोना विषाणू हा साथीचा रोग असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मार्च महिनाअखेरपर्यंत राज्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव आणि व्यायामगृहे बंद ठेवण्यात येणार आहे.