महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उर्दू लेखक मुजतबा हुसैन पद्मश्री पुरस्कार करणार परत

प्रसिद्ध उर्दू लेखक मुजतबा हुसैन यांनी आपण पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुजतबा हुसैन
मुजतबा हुसैन

By

Published : Dec 18, 2019, 7:36 PM IST

नवी दिल्ली -प्रसिद्ध उर्दू लेखक मुजतबा हुसैन यांनी आपण पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे जाहीर केले आहे. देशाची लोकशाही ढासळली असून कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. सकाळी 7 वाजता शपथविधी पार पडतो आहे. तर कुठे रात्री सरकार स्थापन केले जात आहे. देशामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असल्याचे हुसैन म्हणाले.

देशात मॉब लिंचींग, अत्याचार असे अनेक अपराध दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लोकशाहीपुढे आव्हान उभे राहिले आहे. गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान लोकांनी उभारलेली लोकशाहीची रचना पूर्णपणे विखुरली आहे. लोकांचा आवाज दाबला जात असल्याचे हुसैन म्हणाले. मुजतबा हुसैन यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: एबीव्हीपीचा कार्यकर्ता दिल्ली पोलिसांच्या ताफ्यात; जाणून घ्या 'व्हायरल' सत्य

यापूर्वी शिरीन दळवी यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशात फूट पाडणारे आणि भेदभाव करणारे विधेयक आहे. माझ्या समुदाय आणि सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.

हेही वाचा -CAA protest: हरियाणातील नूह जिल्ह्यात आंदोलन, २ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात

ABOUT THE AUTHOR

...view details