हैदराबाद - हैदराबाद, कर्नाटक, मुंबई येथे जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे पाण्याचा निचरा होण्याची समस्या निर्माण झाली. त्यात अनेकांचा जीव गेला आहे. शहरात पूर येण्याची समस्या काही नवीन नाही. मात्र, आता शहरी पुराची समस्या अधिकाधिक वाढत चालली आहे. दिवसेंदिवस शहरातील सामाजिक-पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि जनजीवनात अडथळे येत आहेत.
पूर वर्षे -
- हैदराबाद - 1908, 1930, 1954, 1962, 1970, 2001 आणि 2012, 2020
- दिल्ली - 1924, 1947, 1967, 1971, 1975, 1976, 1988, 1993, 1995, 1998, 2002, 2003, 2009, 2010, 2011, 2013
- चेन्नई - 1943, 1976, 1985, 1996, 2005, 2004, 2015
- मुंबई - 2000, 2005, 2008, 2009, 2010
- कोलकाता - 1978, 2007
- सुरत - 2006
- जमशेदपूर - 2008
- गुवाहटी - 2010
- जयपूर - 2012
- जम्मू काश्मीर - 2014
- केरळ - 2018
हैदराबादमधील सांडपाणी व्यवस्थापन -
शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाची रचना (ड्रेनेज सिस्टम) प्रती तासानुसार 12 मिमी पाऊस गृहीत धरून केली आहे. झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे सांडपाणी वाहून नेणारे मार्ग एकतर अडवले गेले किंवा त्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले.
ज्या ठिकाणी पाणी तुंबते, ते भाग कमी करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. त्यासाठी घरांची रचना, उभी आणि आडवी एकरेषीय हवी. काही ठिकाणीच्या इमारती नव्या ठिकाणी हलवायला हव्यात.
दीर्घ काळाचा विचार करता, शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नव्याने ड्रेनेज व्यवस्था बांधण्यात यावी. हैदराबाद शहराचा विचार करता, मुशी नदीत पावसाचे पाणी जाण्याकरीता, उंच किंवा सखल भागातही सांडपाण्याची व्यवस्थाही उभारावी.