नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने, 31 मे रोजी होणारी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2020 ला स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारने आजपासून तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात केल्यानंतर आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा...लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...
परिस्थितीच्या आढव्यानंतर नवीन तारिख...
देशभरातील लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असतात. साधारणतः वर्ष-दोन वर्षांपासून एका परीक्षेची तयारी विद्यार्थी करत असतात. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे 20 मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तारिख जाहीर करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. तसे पाहता आयोगाची परिक्षा 31 मे रोजी होणार होती. मात्र, लॉकडाऊनचा काळ वाढवल्याने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.