लखनऊ -उत्तर प्रदेश (पूर्व) प्रभारी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुन्ह्यांचा वेग राज्यकारभाराच्या वेगाच्या तुलनेत दुप्पट वाढला आहे,' अशी टीका प्रियांका यांनी ट्विटमधून केली.
"उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील कारभारी प्रशासन वेगाने कार्यरत असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने गुन्हेगारीचे मीटर धावत असल्याचे दिसत आहे," असे ट्विट त्यांनी केले आहे.
ट्विटसह प्रियांका यांनी एक ग्राफिक शेअर केला आहे. यामध्ये 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट रोजीच्या गुन्ह्यांची संख्या देऊन त्याला 'उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी मीटर" असे शीर्षक दिले आहे.