नवी दिल्ली - मध्यप्रदेशातील भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर याचा शपथविधी सुरू झाल्यानंतर लोकसभेत विरोधाकांनी गदारोळ केला. हा वाद साध्वी प्रज्ञा यांच्या नावामुळे झाला. साध्वी प्रज्ञा यांनी संस्कृतमध्ये शपथ घेण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या नावाचा उच्चार 'साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी' असा केला. त्यावर विरोधी पक्षातील खासदारांनी गोंधळास सुरुवात केली. त्यामुळे शपथविधीदरम्यान साध्वी प्रज्ञा थांबल्या.
लोकसभेत भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांचा शपथविधी सुरू होताच विरोधकांकडून गदारोळ - sadhvi pragya singh thakur poorn chetnand avdheshanand giri
विरोधकांचा गदारोळ चालूच होता. साध्वी प्रज्ञा यांनी दुसऱ्यांदा शपथ घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधकांचा आवाज वाढला. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा थांबावे लागले. शेवटी तिसऱ्यांदा त्या शपथ पूर्णपणे घेऊ शकल्या.
![लोकसभेत भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांचा शपथविधी सुरू होताच विरोधकांकडून गदारोळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3586965-636-3586965-1560783038791.jpg)
विरोधी पक्षांनी त्यांच्या नावावर आक्षेप घेत त्यांनी केवळ स्वतःचेच नाव घ्यावे, असे म्हटले. यावर साध्वी प्रज्ञा यांनी हे त्यांचेच नाव असल्याचे सांगितले. या वादानंतर सभापतींनी रेकॉर्ड तपासले. त्यांनी रेकॉर्डमध्ये असलेल्या नावानेच शपथ घेता येईल, असे सांगितले. दरम्यान, अनेक भाजप खासदारांनीही साध्वींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
लोकसभा खासदारांच्या रेकॉर्डची फाईल डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे नेण्यात आली. त्यांनी रेकॉर्ड तपासले. यादरम्यान विरोधकांचा गदारोळ चालूच होता. साध्वी प्रज्ञा यांनी दुसऱ्यांदा शपथ घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधकांचा आवाज वाढला. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा थांबावे लागले. शेवटी तिसऱ्यांदा त्या शपथ पूर्णपणे घेऊ शकल्या.