पाटणा - ईव्हीएमचे रक्षण करण्यासाठी गरज पडल्यास प्रसंगी हत्यारही उचलू असे वक्तव्य राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी केले आहे. पाटणा येथे महागटबंधनच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ईव्हीएमच्या रक्षणाची गरज पडल्यास हत्यारही उचलू - उपेंद्र कुशवाहा - mahagathbandhan
'जर ईव्हीएममध्ये फेरफार झाल्यास स्थिती खराब होईल. रस्त्यावर रक्त सांडेल. मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की असे कोणतेही काम करण्याचा विचारही करु नका,' असे उपेंद्र कुशवाहा म्हणाले.
उपेंद्र कुशवाहा
आज निवडणुकीचा निकाल लुटण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. याला प्रतिबंध घालण्यासाठी हत्यार उचलावे लागल्यास ते करु, असे कुशवाहा म्हणाले. ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचा काही जण प्रयत्न करण्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
कुशवाहा म्हणाले, 'जर ईव्हीएममध्ये फेरफार झाल्यास स्थिती खराब होईल. रस्त्यावर रक्त सांडेल. मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की असे कोणतेही काम करण्याचा विचारही करु नका.