महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश, पंजाब आणि मिझोरम राज्यांत सर्वाधिक रस्ता अपघात - राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो

राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालानुसार देशभरामध्ये 4,37,396 अपघातांमध्ये 1,54,732 जणांचा मृत्यू झाला आहे. 2018मध्ये 4,45,514 रस्ते अपघात झाले होते.

राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो

By

Published : Sep 5, 2020, 7:37 PM IST

नवी दिल्ली - सर्वाधिक रस्ते अपघातांचे प्रमाण भारतात आहे. भारतामध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे 4 लाखांजवळ रस्ते अपघात होतात. यामध्ये 1 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. उत्तर प्रदेश, पंजाब आणि मिझोरम राज्यांत 2019मध्ये रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, असे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या 37,537 वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये 23,285 लोक मरण पावले आहेत आणि 22,251 जखमी झाले आहेत. तसेच पंजाब राज्यात 6,316 अपघातांमध्ये 4,613 जणांचा मृत्यू आणि 3,726 जण जखमी झाले आहेत.

मिझारोम राज्यात 57 रस्ते अपघातांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. देशभरामध्ये 4,37,396 अपघातांमध्ये 1,54,732 जणांचा मृत्यू झाला आहे. 2018मध्ये 4,45,514 रस्ते अपघात झाले होते.

2019मध्ये, दुचाकी वाहनांचे जास्त जीवघेणे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 58,747 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि लॉरीच्या अपघातांमध्ये 22,637 लोकांचा मृत्यू झाला तर कार अपघातांत 21,196 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये दुचाकी अपघातांत जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात असले, तरीही दुसरीकडे वाहनचालकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details