नवी दिल्ली - उत्तर प्रदेश पोलिसांनी छापा टाकून तब्बल 35 करोड रुपयांची एनसीईआरटीची (राष्ट्रीय शिक्षा संशोधन, तसेच प्रशिक्षण संस्था) नकली पुस्तके हस्तगत केली आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाने संयुक्तपणे ही कामगिरी केली. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी सचिन गुप्ता फरार झाला. छपाई मशिन आणि 35 करोड रुपयांची पुस्तके आम्ही जप्त केली आहेत, असे मेरठच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगतिले.
उत्तर प्रदेश : 35 करोड रुपयांची एनसीईआरटीची नकली पुस्तके जप्त
उत्तर प्रदेश पोलिसांनी छापा टाकून तब्बल 35 करोड रुपयांची एनसीईआरटीची (राष्ट्रीय शिक्षा संशोधन, तसेच प्रशिक्षण संस्था) नकली पुस्तके हस्तगत केली आहेत. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी सचिन गुप्ता फरार झाला.
1.5 लाख पुस्तकांच्या प्रतींचे बेकायदेशीरित्या छापण्यात आल्या होत्या. ही पुस्तके कायद्यांचे उल्लंघन करून उत्तराखंड, दिल्ली आणि इतर राज्यात विकल्या जात होत्या. आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येथे छापा टाकण्यात आला. पुस्तके छपाई करणारी मशिन आणि ज्या ठिकाणी पुस्तके ठेवण्या येत होती, तो गोदाम सील करण्यात आला आहे. तसेच फरार मुख्य आरोपी सचिन गुप्ताचा शोध घेण्यात येत आहे, असे मेरठच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगतिले.
मेरठ पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर छापा टाकला. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात एनसीईआरटीची नकली पुस्तके आढळली. छापा मारल्यानंतर आरोपींनी पुस्तके जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना आग विझवून पुस्तके जप्त केली.