लखनऊ - अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी मुलीचे शाळेबाहेरून अपहरण केले होते. ही घटना आझमगड जिल्ह्यातील सराई मीर भागामध्येही काल (सोमवारी) घडली होती.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी उत्तरप्रदेशातील दोघेजण अटकेत - abusing minor girl
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
दोन्ही आरोपींनी मुलीला कारमध्ये बळजबरीने बसवून पळवून नेले होते. त्यानंतर धावत्या कारमध्ये अत्याचार केल्यानंतर मुलीला सोडून दिले होते. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कुटुंबीयांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
घटनेनंतर पिडीत मुलीचे नाव शाळेतून कमी करण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, पोलीसांनी तपास केला असता या माहितीमध्ये तथ्य आढळून आले नाही. याविषयी शाळेच्या मुख्यध्यापकाशी चर्चा केल्याचे आझमगडच्या पोलीस अधिकारी त्रिवेणी सिंह यांना सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.