बल्लिया - उत्तर प्रदेशातील बल्लिया येथील भाजप नेते सुरेंद्र सिंह यांनी 'मुस्लिमांची प्रवृत्ती जनावरांसारखी' असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जे मुस्लीम पुरुष अनेक लग्ने करतात आणि अनेक मुलांना जन्म देतात, त्यांची प्रवृत्ती जनावरांसारखी असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.
मुस्लीम पुरुष अनेक लग्ने करतात, अनेक मुलांना जन्म देतात; ही प्रवृत्ती जनावरांसारखी - भाजप नेता - muslim
'मुस्लीम धर्मीय लोक ५० बायकांशी लग्ने करतात आणि १०५० मुलांना जन्म देतात. ही काही परंपरा नव्हे. ही पाशवी प्रवृत्ती आहे. समाजात केवळ २ ते ४ मुलांनाच जन्म देणे ही सर्वसाधारण बाब आहे,' असे सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
'तुम्हाला माहीत आहे की, मुस्लीम धर्मीय लोक ५० बायकांशी लग्ने करतात आणि १०५० मुलांना जन्म देतात. ही काही परंपरा नव्हे. ही पाशवी प्रवृत्ती आहे. समाजात केवळ २ ते ४ मुलांनाच जन्म देणे ही सर्वसाधारण बाब आहे,' असे सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. आमदार सिंह याआधीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मागील वर्षी जुलैमध्ये त्यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रत्येक हिंदू जोडप्याला ५ मुले असली पाहिजेत, असे वक्तव्य केले होते. भारतात हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले होते.
'प्रत्येक धार्मिक गुरुची (महंत) हीच इच्छा आहे की, प्रत्येक हिंदू जोडप्याला किमान ५ मुले असली पाहिजेत. अशा प्रकारे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवल्यास हिंदुत्व शाबूत राहील,' असे त्यांनी म्हटले आहे.