लखनऊ :भारत- चीन सीमा वादानंतर चिनी वस्तू आणि सेवांवर बहिष्कार घालण्याचे अभियान सबंध भारतात जोर धरत आहे. नुकतेच केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती सुरक्षेचे कारण देत चीनच्या 59 मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. त्यानंतर उत्तरप्रदेशातील एका माजी महिला आमदाराने मोबाईलमधून चिनी अॅप डिलीट करणाऱ्यांना मोफत मास्क वाटप करण्याचे अभियान राबविले आहे.
अनुपमा जैसवाल असे या माजी महिला आमदाराचे नाव असून त्या याआधी उत्तरप्रदेश सरकारमध्ये मंत्रीपदावर होत्या. चिनी माल हटाव मोहिमेला बळकटी देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी त्यांनी स्थानिक महिला मोर्चा संघटनेचीही मदत घेतली आहे. जो मोबाईलमधील चिनी अॅप डिलीट करेल त्याला मास्क देण्यात येत आहे. जैसवाल या योगी आदित्यनाथ सरकारमध्ये प्राथमिक शिक्षण मंत्रीही होत्या.