महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Uttar Pradesh

उत्तर प्रदेशमध्ये इठा जिल्ह्यातील जैथारा भागामधील एका गावात अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून अन्य दोन जण फरार आहेत.

etah
jaithara

By

Published : Dec 27, 2019, 1:21 PM IST

लखनौ- उत्तर प्रदेशमध्ये इठा जिल्ह्यातील जैथारा भागामधील एका गावात अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून अन्य दोन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, आरोपींनी माझ्या मुलीला शेताकडे ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. घटना घडल्यानंतर आम्ही त्यांचा शोध घ्यायला गेलो असता, त्यांनी आमच्यावर गोळीबारही केला. याबाबत आम्ही तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे असे, पीडितेच्या वडिलांनी सांगितले.

या घटनेतील अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वय १५ ते २० वर्षांदरम्यान आहे. पीडितेवर बलात्काराप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती मंडल अधिकारी अजय भदोरिया यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details