महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात समाजकंटकांकडून महापुरुषाच्या पुतळ्याचा अवमान, दिल्ली-यमुनोत्री महामार्गावर ट्रॅफिक जाम - ambedkars statue in saharanpur

महापुरुषाच्या पुतळ्याच्या अवमानाची घटना घडल्यानंतर लोकांनी निषेध व्यक्त करत दिल्ली-यमुनोत्री महामार्गावर रास्तारोको केले. या निदर्शनांमुळे सिद्धपीठ शाकंभरी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची वाहने ट्रॅफिक जाममध्ये अडकली.

उत्तर प्रदेश

By

Published : Sep 10, 2019, 12:04 PM IST

सहारनपूर -उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याचे काही समाजकंटकांनी अवमान केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात समाजकंटकांकडून महापुरुषाच्या पुतळ्याचे नुकसान

महापुरुषाच्या पुतळ्याच्या अवमानाची घटना घडल्यानंतर लोकांनी निषेध व्यक्त करत दिल्ली-यमुनोत्री महामार्गावर रास्तारोको केले. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. या निदर्शनांमुळे सिद्धपीठ शाकंभरी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची वाहने ट्रॅफिक जाममध्ये अडकली.

ABOUT THE AUTHOR

...view details