महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट होणार सील - corona live news

उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यातील 37 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 334 आहे. यातील 168 रुग्ण तबलिगी जमात कार्यक्रमाशी संबंधित आहेत.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ

By

Published : Apr 8, 2020, 8:10 PM IST

लखनौ- उत्तर प्रदेशात कोरोना संकट वाढत असल्याने योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ज्या 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा जास्त प्रसार झाला आहे, त्या जिल्ह्यांतील काही ठिकाणे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यामध्ये सहापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यातील 37 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 334 आहे. यातील 168 रुग्ण तबलिगी जमात कार्यक्रमाशी संबंधित आहेत. राज्यसरकारने या 15 जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊ, गौतममबुद्ध नगर, गाजियाबाद, वाराणसी, कानपूर, सीतापूर, शामली, मेरठ, बरेली, बुदंलशहर, फिरोजाबाद, महाराजगंज, सहारनपूर आणि बस्ती या जिल्ह्यात कोरोना जास्त पसरला आहे.

इतर 22 जिल्ह्यांमध्ये एक ते पाचपर्यंत कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. अप्पर गृह सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले, की आज रात्री 12 वाजेपासून निवडण्यात आलेल्या ठिकाणांना सील करण्यात येईल. कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details