महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

योगींचा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना दणका; 200 अधिकाऱ्यांना देणार सक्तीची सेवानिवृत्ती

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचारविरोधात मोठी कारवाई केली आहे. राज्यातील भ्रष्टाराचाराचे आरोप असलेल्या आयएएस व आयपीएस ६०० अधिकाऱ्याची यादी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ

By

Published : Jul 3, 2019, 2:31 PM IST

Updated : Jul 3, 2019, 4:24 PM IST

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. राज्यातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आयएएस व आयपीएस ६०० अधिकाऱ्याची यादी केंद्र सरकारकडे पाठवली आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून काढण्यासाठी एका फटक्यात अधिकाऱयाची सक्तीची सेवानिवृत्ती तसेच खात्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीत भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठवली आहे.


600 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असून यात 200 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती तर 400 अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Last Updated : Jul 3, 2019, 4:24 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details