मुझ्झफरनगर (उत्तर प्रदेश)- अनेक प्रकरणांमध्ये पतीने पत्नीला पोटगी दिल्याचे आपण ऐकले असेल, पण एका प्रकरणात न्यायालयाने पत्नीला पोटगी देण्यास सांगितले आहे. मुझ्झफरनगरच्या कौटुंबिक न्यायालयाने सरकारी पेन्शनधारक महिलेला पतीला दरमहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.
संबंधित महिला आणि तिचे पती गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहत आहेत. पतीने २०१३ मध्ये हिंदू विवाह कायदा, १९५५ नुसार न्यायालयात पत्नीकडून पोटगी मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती.