भुवनेश्वर - चीनवरून परतलेल्या एका जोडप्याला ओडिशाच्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मूळ उत्तरप्रदेशच्या असणाऱ्या या जोडप्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
१५ फेब्रुवारीला चीनहून निघालेले एक जहाज, १ मार्चला पारादीप बंदरावर दाखल झाले. यामध्ये २३ खलाशी होते. यांपैकी एकाच्या अंगात ताप असल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्याला एससीबी रूग्णालयात पाठवले आहे, अशी माहिती पारादीप बंदर रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रल्हाद पांडा यांनी दिली.
दरम्यान, कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आपण सज्ज असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री नवकिशोर दास यांनी म्हटले आहे. राज्यामध्ये या विषाणूला लढा देण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच, एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले, की १५ जानेवारीनंतर कोरोना बाधित देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांना ते निरिक्षणाखाली ठेवत आहेत.
भारतात सध्या दिल्ली, तेलंगाणा आणि जयपूरमध्ये मिळून कोरोनाचे चार रूग्ण आढळले आहेत. तसेच, तेलंगाणा आणि नोएडामध्ये आणखी संशयित आढळले आहेत.
हेही वाचा :जयपूरमधील कोरोनाग्रस्त इटालियन नागरिकाच्या पत्नीलाही झाली विषाणूची लागण..