महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'करा किंवा मरा,' अपहरण करून खुनाच्या तिसऱ्या प्रकरणानंतर योगी अधिकाऱ्यांवर भडकले - उत्तर प्रदेशात अपहरण, खून

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यात अपहरण आणि खुनाच्या घटनांमुळे भडकले असल्याचे पुढे आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ‘करा किंवा मरा’ असे आदेश दिले आहेत.

योगी न्यूज
योगी न्यूज

By

Published : Jul 29, 2020, 6:04 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यात अपहरण आणि खुनाच्या घटनांमुळे भडकले असल्याचे पुढे आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ‘करा किंवा मरा’ असे आदेश दिले आहेत. कानपूर देहात येथे मंगळवारी अपहरण आणि हत्येचे आणखी एक प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री योगींनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कानपूर आणि गोरखपूरमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

राष्ट्रीय सरकार अधिनियम (एनएसए) नुसार आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. याअंतर्गत ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला कोणत्याही आरोपाशिवाय १२ महिने तुरूंगात ठेवता येते. राज्याचे पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशिरा सर्व पोलीस कर्मचार्‍यांना यासंबंधीची अ‌ॅडव्हायजरी जारी करून अपहरणाच्या तक्रारी त्वरित व गांभीर्याने हाताळण्यास सांगितले.

उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून खंडणीसाठी अपहरणाच्या घटना वारंवार घडत आहेत. यातून खून झाल्याचेही समोर येत आहे. लोकांमध्ये घबराट पसरली असून कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तसेच, आतापर्यंत अशा घटना थांबवण्यात अपयश आल्याने सरकारवर नाकर्तेपणाचे आरोपही होत आहेत. यामुळे मुख्यमंत्री योगींनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

भोगनीपूर येथून ब्रिजेश पाल या व्यक्तीचे 16 जुलैला अपहरण झाले होते. ते कानपूर-झाशी महामार्गावरील टोल प्लाझावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते 16 जुलैला टोल प्लाझावर पोहोचले होते. तेथे ते मध्यरात्रीपर्यंत थांबणार होते. त्यांनी तेथे रात्र घालवण्याचे ठरवले होते. मात्र, सकाळी येथे सुरक्षा रक्षक आल्यानंतर त्यांना तेथे कुलूप असून बिजेश तेथे नसल्याचे आढळून आले. त्यांच्या कुटुंबीयांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी ब्रिजेश यांच्या मोबाईलवर संपर्क केला. एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून त्यांच्याकडे 20 लाखांच्या खंडणीची मागणी केली. याची ऑडिओ क्लिप पोलिसांकडे नेली असता, एका संशयिताचा शोध लागला. त्याने दिलेल्या माहितीनुसार शोध घेतल्यानंतर ब्रिजेश यांचा मृतदेह एका विहिरीत सापडला. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याने ब्रिजेश यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. यानंतर योगी सरकारने ब्रिजेश यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देण्याची घोषणा केली.

अशाच प्रकारच्या अनेक घटना समोर आल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर ट्विटमधून जोरदार टीका केली होती. तसेच, पोलिसांनी जबाबदारीने काम करावे, असे म्हटले होते. तर, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी राज्य सरकारची 'एन्काऊंटर पॉलिसी' अपयशी ठरली असून गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी भीती उरली नसल्याचे म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details