नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. या औपचारिक भेटीत पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता, यमुना नदीची स्वच्छता आदी विषयांवर चर्चा झाली.
योगी आदित्यनाथ आणि जलशक्ती मंत्री शेखावत यांची भेट - union jal shakti minister gajendra singh shekhawat
तमीळनाडू येथील निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींनी पुन्हा सत्तेत आल्यास स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते.
शेखावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणित सरकार पिण्यायोग्य पाठी पुरवण्यास कटिबद्ध असल्याचे मंगळवारी म्हटले होते. जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती नुकतीच करण्यात आली आहे. जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचे एकत्रीकरण करून या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. मागील कार्यकाळात नितीन गडकरी यांच्याकडे हे खाते होते.
तमीळनाडू येथील निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींनी पुन्हा सत्तेत आल्यास स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते.