लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी उन्नाव बलात्कार पीडितेच्या मृत्यूविषयी दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल, असे त्यांनी प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगींनी उन्नाव पीडितेच्या मृत्यूविषयी व्यक्त केले दुःख - safdarjung hospital
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्यावर झालेल्या बलात्कारासंबंधातील सुनावणीसाठी स्थानिक न्यायालयात निघाली होती. हा खटला मार्चमध्ये दाखल करण्यात आला होता. वाटेत पाच आरोपींनी तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.
उन्नाव प्रकरणातील पीडितेला गुरुवारी बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपांसह आणखी तिघांनी मिळून रॉकेल ओतून पेटवून दिले होते. यानंतर ती मदतीसाठी एक किलोमीटर धावत गेली होती. मात्र, तिला मदत मिळेपर्यंत ती ९० टक्के भाजली. त्यानंतर पीडितेने उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात प्राण सोडले. दोन दिवसांच्या उपचारांदरम्यान तिला श्वसनास त्रास होऊ लागल्याने कृत्रिम जीवनसंरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी कार्डिअॅक अॅरेस्टनंतर रात्री ११:४० वाजता तिची प्राणज्योत मालवली. गुरुवारी तिची प्रकृती गंभीर बनल्यामुळे तिला लखनऊच्या एसएमसी शासकीय रुग्णालयातून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हवाई मार्गाने हलवण्यात आले होते.