लखनऊ - उत्तर प्रदेशच्या महासी विधानसभेतील भाजप आमदार सुरेश्वर सिंह यांनी गोहत्येसंदर्भात गंभीर आरोप केला आहे. लॉकडाऊनदरम्यान बहरीच जिल्ह्यामधील गोहत्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे, की लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बहरीच जिल्ह्यात होणाऱ्या गोवंश हत्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये बैल, बछडे यांच्यासह गाईंचाही काही प्रमाणात समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, की हे जर असेच चालू राहिले, तर राज्याच्या राजधानीपासून अवघे १३० किलोमीटर असलेल्या या जिल्ह्यामध्ये कुठेच गाई दिसणार नाहीत.