बंगळुरु - भारत स्वतंत्र होवून अनेक दशके लोटली आहेत. मात्र, अस्पृश्यता अजूनही देशातून समूळ नष्ट झाली नाही. अजूनही अस्पृश्यतेची उदाहरणे पाहायला मिळतात. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यामध्ये एक अस्पृश्यतेची घटना समोर आली आहे. थिगरी या गावामध्ये एक विशिष्ट जातीच्या लोकांना हॉटेलमध्ये हाताने पाणी घेण्याची परवानगी नाही. तसेच त्यांना पाणी पिण्यासाठी वेगळे भांडे ठेवण्यात आले आहे.
अस्पृश्यता अजूनही खोलवर रुजलेली; हॉटेलमध्ये पाणी घेण्यास विशिष्ट जातीच्या लोकांना मज्जाव - कोप्पल जिल्ह्यामध्ये अस्पृश्यता
कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यामध्ये एक अस्पृश्यतेची घटना समोर आली आहे. विशिष्ट जातीच्या लोकांना हॉटेलमध्ये हाताने पाणी घेण्याची परवानगी नाही.
अस्पृश्यता
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाची येचुरींना जम्मू-काश्मीरला जाण्याची परवानगी
हॉटेलचा मालक या जातीच्या लोकांना स्वत: भांड्याने पाणी ओतून देतो. एका व्हिडिओमध्ये हॉटेलमधील हे ग्राहक हाताच्या ओंजळीने पाणी पिताना दिसत आहेत. हॉटेलच्या आतमध्ये येवून पाणी घेण्याची परवानगीही त्यांना नाही. एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढला आहे.