महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीर मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघाचा चीनसह पाकिस्तानला पुन्हा दणका - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बंद दरवाज्याआड चर्चा झाली. मात्र, या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही - सईद अकबरुद्दीन

सईद अकबरुद्दीन
सईद अकबरुद्दीन

By

Published : Jan 16, 2020, 10:23 AM IST

Updated : Jan 16, 2020, 10:33 AM IST

नवी दिल्ली - काश्मीर विषयावर संयुक्त राष्ट्रात चर्चा व्हावी म्हणून चीन आणि पाकिस्तानने विषय उचलून धरला होता. यावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बंद दरवाज्याआड चर्चा झाली, मात्र या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळून आले नसल्याचे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी सदस्य सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले. आम्हाला जे वाटत होत, तेच झाल्याचेही ते म्हणाले.

काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रात रंगवले होते. मात्र, पाकिस्तानने वेळोवळी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही. काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असून पाकिस्तान आणि भारताने तो चर्चेद्वारे सोडवावा, असे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबध असून त्याद्वारे दोघांमधील प्रश्न सोडवण्यात येतील, असे मत सुरक्षा परिषदेतील इतर सदस्य देशांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीनंतर चीनच्या प्रतिनीधीने पत्रकार परिषदही घेतली होती. आम्ही जम्मू-काश्मीरविषयावर चर्चा केली. काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही संयुक्त राष्ट्राला पत्र पाठवले होते. भारत पाकिस्तान प्रश्न संयुक्त राष्ट्रासमोरील प्रामुख्याचा विषय आहे. आताही काश्मीरात तणाव असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, असे चीनच्या प्रतिनीधीने बैठकीनंतर सांगितले.
Last Updated : Jan 16, 2020, 10:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details