उन्नाव - दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. तिला बलात्कार करणाऱ्या दोघांसह आणखी तिघांनी रॉकेल ओतून पेटवून दिले होते. शुक्रवारी रात्री पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आल्याशिवाय पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्री योगींच्या भेटीनंतरच अंत्यसंस्कार, पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका
पीडितेच्या बहिणीने आपल्याला न्याय हवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, आपल्याला न्यायालयाकडून न्याय मिळेल असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यायालय पैसेवाल्यांसाठी आहे. आपल्यासारख्या गरिबांकडे पैसा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगींना बोलवावे, अशी मागणी पीडितेचे कुटुंबीय करत आहेत. त्यांना आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, सरकारने त्यांच्या परिवारातील व्यक्तीला नोकरी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.