महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उन्नाव: बलात्कार पीडितेचा अखेर मृत्यू - unnao rape victim

आज कानपूरमधील हैलट रुग्णालयात बलात्कार प्रकरणातली पीडितेने अखेरचा श्वास घेतला.

उन्नाव: बलात्कार पीडितेचा अखेर मृत्यू
उन्नाव: बलात्कार पीडितेचा अखेर मृत्यू

By

Published : Dec 21, 2019, 10:06 PM IST

कानपूर -आरोपीला न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन मिळाल्यामुळे बलात्कार प्रकरणातली पीडितेने उन्नाव पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर 16 डिसेंबरला स्वत: ला पेटवून घेतले होते. त्यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज कानपूरमधील हैलट रुग्णालयात तीने अखेरचा श्वास घेतला.

पीडित महिला हसनगंजची रहिवासी आहे. आगी ती 85 टक्के पर्यंत भाजली होती. मुख्य आरोपी अवधेश सिंह यांच्यावर पीडिताने 2 ऑक्टोबरला बलात्काराचा खटला दाखल केला होता. मात्र मुख्य आरोपीला 28 नोव्हेंबरला हायकोर्टाकडून अटक स्थगती मिळाली होती. त्यावरून उन्नाव पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर तीने स्वत: ला पेटवून घेतले होते.

आरोपी आणि पीडिता हे दोघे बऱयाच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत. आरोपीने लग्नाला नकार दिल्यावर पीडित महिलेने 2 ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पण दरम्यान, आरोपीला हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळाला.

ABOUT THE AUTHOR

...view details