लखनऊ - उन्नावमध्ये अत्याचार झालेल्या एका २३ वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याची परवानगी स्थानिक न्यायालयाने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार शुभम, शिवम, हरी शंकर, उमेश आणि राम किशोर या सर्व आरोपींच्या रक्ताचे नमुने काल (मंगळवार) गोळा करण्यात आले.
आम्ही पीडितेचे कपडे, मोबाईल फोन, बॅग आणि पाण्याची बाटली अशा गोष्टी ठेवल्या आहेत. त्यावरील डीएनए सॅम्पल्स आणि आरोपींचे डीएनए तपासून, ते जुळतात का हे आम्ही पाहणार आहे. अशी माहिती उन्नाव पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी दिली. आम्ही हे संपूर्ण प्रकरण शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे हाताळणार आहोत. आम्हाला भक्कम पुरावे मिळाल्यानंतर आम्ही त्याआधारे चार्जशीट भरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोबाईल लोकेशनही ठरणार महत्त्वाचा पुरावा..