महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अनलॉक ५ : चित्रपटगृहे, तरण तलाव होणार खुले; शाळा सुरू करण्याबाबत राज्यांना निर्णय स्वातंत्र्य

१५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर सोडला आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 30, 2020, 9:56 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनलॉक ५ अंतर्गत पुन्हा नियमावली जारी केली आहे. चित्रपटगृहे, तरण तलाव, मनोरंजन पार्क १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येतील, असे नियमावलीत म्हटले आहे. १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर सोडला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ ची नियमावली जारी केली आहे. चित्रपटगृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू होऊ शकतात. त्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय नियमावली जारी करेल. तसेच समाजिक,सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमाला १०० पेक्षा जास्त व्यक्ती जमू शकतात, असे नियमावलीत म्हटले आहे.

हेही वाचा -केंद्राच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश रद्द; राज्य सरकारचा निर्णय

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतीक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यास याआधीच परवानगी दिली आहे. मात्र, १०० व्यक्तींची अट घालण्यात आली आहे. कन्टेंनमेंट झोनच्या बाहेर ही परवानगी आधीच देण्यात आली आहे. आता राज्यांना यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राने १५ ऑक्टोबरपासून दिला आहे. बंद जागेतील सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेने नागरिक जमू शकतात. तर जास्तीत जास्त २०० व्यक्तींची अट घालण्यात आली आहे. फेसमास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंगचा वापर अनिवार्य आहे. तसेच फिजिकल डिस्टंन्सिगही अनिवार्य आहे.

हेही वाचा -आरे वृक्षतोड : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शाळा कधी सुरू होणार?

शाळा आणि कोचिंग इन्स्टिट्युट सुरू करण्याबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लवचिकता देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्यांना दिले आहे. संबंधीत शाळा आणि संस्थांशी चर्चा करून याबाबत निर्णय प्रशासन घेवू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details