नवी दिल्ली- कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचे ३१ रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासन कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न आहे. आता सर्व महाविद्यालयांची सर्वोच्च संस्था असेलल्या विद्यापीठ अनुदान आयोगानेही विद्यापीठ आणि महाविद्यालयांसाठी नियमावली (अॅडव्हायजरी) जारी केली आहे.
'कोरोना' विद्यापीठे अन् महाविद्यालयांनाही झटका.. सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत युजीसीची नवी नियमावली - कोरोना रुग्ण भारत
'विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थी एकत्र जमतील, असे कार्यक्रम आयोजित करणे टाळावे. तसेच एखादा विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी कोरोनाचा प्रसार झालेल्या देशातून प्रवास करून माघारी आला असेल, तर त्याने १४ दिवस घरामध्येच एकांतात रहावे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावलीत म्हटले आहे.
'विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थी एकत्र जमतील, असे कार्यक्रम आयोजित करणे टाळावे. तसेच एखादा विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी कोरोनाचा प्रसार झालेल्या देशातून प्रवास करून माघारी आला असेल, तर त्याने १४ दिवस घरामध्येच एकांतात रहावे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावलीत म्हटले आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंम्मेलन आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. कोरोनाच्या भीतीमुळे महाविद्यालयांना आता युजीसीची नियमावली पाळावी लागणार आहे.
भारतामध्ये कोरोना विषाणूची आत्तापर्यंत ३१ जणांना लागण झाली आहे. तर २८ हजार जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. प्रत्येक विमानतळावर प्रवाशांची तपासणी घेण्यात येत आहे. लाखो प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. इराण, चीन, दक्षिण कोरिया, इटली या देशांमधून येणाऱ्या नागरिकांच्या व्हिजावर निर्बंध घालण्यात आले आहे.