महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पाँपेओंनी घेतली मोदींची भेट; आंतरराष्ट्रीय विषयावर करणार चर्चा - Pompeo

माईक पाँपेओ यांनी बुधवारी डॉ. एस. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

माईक पाँपेओ

By

Published : Jun 26, 2019, 9:12 AM IST

Updated : Jun 26, 2019, 2:03 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पाँपेओ भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी डॉ. एस. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पाँपेओ अमेरिकेबरोबरील व्यवसायातील तणावपूर्ण संबध आणि इतर आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा करणार आहेत.


सध्या इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. अशाच वेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पाँपेओ यांनी मोदींची घेतली भेट


या भेटीत इराणमधून तेल निर्यात, भारत आणि रशिया यांच्या दरम्यान होणारा 400 अॅन्टीबॅलिस्टिक मिसाईल करार, दहशतवाद आणि ट्रम्प यांच्या आशिया पॅसिफिक क्षेत्रातील योजना अशा अनेक मुद्द्यावर चर्चा होणार आहे. भारत 400 अॅन्टीबॅलिस्टिक मिसाईल रशियाकडून खरेदी करू इच्छितो. मात्र अमेरिकेला सगळ्यात शक्तिशाली देश बनायचं आहे. त्यामुळे भारताच्या या कराराला अमेरिकेचा विरोध आहे.


अमेरिका-इराण तणावावरून तेल आणि आर्थिक बाबींवर बराच परिणाम झाला आहे. त्यामुळे अमेरिकेशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. व्यापाराच्या दृष्टीने ही भेट भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.

Last Updated : Jun 26, 2019, 2:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details