नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशात केल्यानंतर लडाखने आपला पहिला वहिला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. केंद्रशासित प्रदेश बनवण्याची लडाखच्या नागरिकांची मागणी फार जुनी आहे. त्यामुळे लडाखसाठी भारताचा ७३ वा स्वांतत्र्य दिन काहीसा विशेष ठरला आहे.
केंद्रशासित लडाखने जल्लोषात साजरा केला पहिला वहिला स्वातंत्र्यदिन - केंद्रशासित लडाख
केंद्रशासित प्रदेश लडाख पहिला स्वांतत्र्य दिन साजरा करत आहे, असे पोस्टर लेहमध्ये जागोजागी झळकत आहेत.
केंद्रशासित प्रदेश लडाख पहिला स्वांतत्र्य दिन साजरा करत आहे, असे पोस्टर लेहमध्ये जागोजागी झळकत आहेत. या क्षणाचे भागीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. पोस्टरच्या समोर उभे राहून फोटो काढत आहेत.
लडाखचे भाजप खासदार जामयांग तेश्रींग यांनी नाचत स्वांतत्र्य दिन साजरा केला. यावेळी नागरिकांनी त्यांच्याबरोबर ठेका धरला. काश्मीर विभाजनाच्या संसदेतील चर्चेवेळी खासदार जामयांग तेश्रींग यांनी जोरदार भाषण करत लडाख केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. लडाख केंद्रशासित प्रदेश बनणयासाठी खूप काळापासून लढा देत असल्याचे ते म्हणाले होते.