नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नागरिकांना घरगुती फेस मास्क तयार करायला प्रोत्साहीत केले आहे.
'घरीच तयार करा मास्क' स्मृती ईराणी यांनी शेअर केले मास्क तयार करतानाचे छायाचित्र - face masks
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नागरिकांना घरगुती फेस मास्क तयार करायला प्रोत्साहित केले आहे.
ईराणी यांनी गुरुवारी इन्स्टाग्रामवर कपड्यापासून मास्क तयार करतानाचे छायाचित्र शेअर केले आहेत. लॉकडाऊच्या काळात घरी बसून मास्क तयार करा. जर आपल्याकडे शिवणकामाची यंत्रणा नसेल तर सुई व धागा वापरा, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे. त्यानुसार मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. घरच्याघरी कॉटनचं कापड, कातर आणि शिवणयंत्राच्या किंवा शिवणकामाच्या वस्तू अशा साध्या घरगुती साधनांच्या सहाय्याने मास्क तयार करता येतात.