नागपूर -भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ते पाहून काँग्रेस का अस्वस्थ होते आहे? असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
'काँग्रेसला भारतरत्न हा फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे..' - रविशंकर प्रसाद भारतरत्न
भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये असे आश्वासन दिले आहे, की सत्तेत आल्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात येईल. यासंदर्भात बोलताना रविशंकर म्हटले, की काँग्रेस यामुळे अस्वस्थ झाली आहे. वीर सावरकर हे देशभक्त नव्हते का? ज्योतिराव फुले, सावित्रिबाई फुले यांसारख्या देशभक्तांनादेखील भारतरत्न दिला गेला पाहिजे. काँग्रेसला मात्र भारतरत्न हा आपल्याच कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे.
!['काँग्रेसला भारतरत्न हा फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे..'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4772978-51-4772978-1571234412592.jpg)
RS Prasad in Nagpur