रामविलास पासवान यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचा अनुभव अतुल्य असा होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचे सल्ले महत्त्वपूर्ण असत. राजकीय धोरणीपणा तसेच लोकांच्या अडचणी सोडविण्यात ते निपूण होते. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती, असे ट्विट मोदींनी केले आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन - ram vilas paswan died
21:36 October 08
रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट
21:31 October 08
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी रामविलास पासवान यांना वाहिली श्रद्धांजली
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी रामविलास पासवान यांना वाहिली श्रद्धांजली
21:27 October 08
पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून दिली माहिती
'पापा, तुम्ही या जगात आता नाहीत. पण मला माहित आहे, तुम्ही जेथे कुठे आहात माझ्या बरोबर आहात. तुमची खुप आठवण येत आहे', असे ट्विट चिराग पासवान यांनी केले आहे.
21:20 October 08
रामविलास पासवान यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
दलित आणि गरीब वर्गाने राजकारणातील बुलंद आवाज गमावला, असे म्हणत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
20:46 October 08
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
नवी दिल्ली -केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे आज(गुरुवार) निधन झाले. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरु होते. त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विटवरून याची माहिती दिली आहे. पासवान यांच्या निधनानंतर राजकीय सामाजिक, राजकीय स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दुपारी 2 वाजता दिल्लीहून पासवान यांचे पार्थिव पाटणा येथे आणल्या जाईल, त्यानंतर सायंकाळी पाटणा येथील दीघा घाटवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
'पापा, तुम्ही या जगात आता नाहीत. पण मला माहित आहे, तुम्ही जेथे कुठे आहात माझ्या बरोबर आहात. तुमची खुप आठवण येत आहे', असे ट्विट चिराग पासवान यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. आज त्यांचे निधन झाले.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक होते. ७४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील आठवड्यात त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. वडिलांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती चिराग पासवान यांनी दिली होती.
"गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांवर उपचार सुरू आहेत. काल सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक ढासळल्यामुळे रात्री उशीरा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली. गरज पडल्यास येत्या काही आठवड्यांमध्ये पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या अडचणीच्या काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे राहिल्याबद्दल सर्वांचे आभार" अशा आशयाचे ट्विट चिराग पासवान यांनी मागील आठवड्यात केले होते.
लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचा जन्म 5 जुलै 1946 रोजी खगडियातील दलित कुटुंबात झाला. त्यांनी बुंदेलखंड विद्यापीठ झांसी येथून एम.ए आणि पाटना विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले.
रामविलास पासवान देशातील अनुभवी नेत्यांपैकी एक होते. पाच दशकांपेक्षा जास्त संसदीय राजकारणाचा अनुभव त्यांच्याकडे होता. ते ९ वेळा लोकसभेवर आणि २ वेळा राज्यसभेवर निवडूण गेले होते.
पासवान यांचा राजकीय प्रवास १९६० च्या दशकात बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून सुरू झाला जो आजपर्यंत चालू होता. १९६९ ला बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून पासवान निवडून आले. १९७७ मध्ये पासवान सहाव्या लोकसभेत जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. १९८२ च्या लोकसभा निवडणुकीत पासवान दुसऱ्यांदा विजयी झाले.
राजकारणाचा मागावो घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. देशात आणीबाणीच्या काळात ते काँग्रेस विरोधात तुरुंगात गेले तर कधी युपीएच्याच मंत्रीमंडळात मंत्री बनले. त्यावेळी भाजप पासवान यांच्या निर्णयांचा विरोध करत होती. त्याच भाजप प्रणित एनडीएच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते.