महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

POK तून भारतात 5300 विस्थापित कुटुंबांना मोदी सरकारचे गिफ्ट, प्रत्येकी 5.5 लाखांचा मदतनिधी - prakash javadekar announces centers scemes

पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात येऊन देशाच्या विविध भागांत ही कुटुंबे स्थायिक झाली. नंतर पुन्हा काश्मीरमध्ये आली, अशा कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

जावडेकर

By

Published : Oct 9, 2019, 11:40 PM IST

नवी दिल्ली - मोदी सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. सरकारने 5300 कुटुंबांना 5.5 लाख रुपये मदतनिधी देण्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात येऊन देशाच्या विविध भागांत ही कुटुंबे स्थायिक झाली. नंतर पुन्हा काश्मीरमध्ये आली, अशा कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारने दिवाळीच्या आधीच लाखो कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी सरकार अतिरिक्त १६ हजार कोटी रुपये देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा १२ टक्क्यावरून १७ टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी वाढीव महागाई भत्त्याचा सुमारे ६२ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार असल्याचे सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details