महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गायीच्या शेणापासून बनवले आंघोळीचे साबण, जाणून घ्या इतकी आहे किंमत - Union Minister Nitin Gadkari launched

शेणापासून केंद्र सरकारने चक्‍क साबण बनविला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या साबणाचे लाँचिंग करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By

Published : Oct 2, 2019, 2:11 PM IST

नवी दिल्ली -गाईचे शेण म्हणजेच गोमय, विषमुक्त आणि प्रदूषणमुक्त करणारे, अशा शेणापासून केंद्र सरकारने चक्‍क साबण बनविला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या साबणाचे लाँचिंग करण्यात आले आहे.


साबण ही अशी एक गोष्ट आहे जिचा वापर घराघरात होतो. त्यामुळे साबणावाटे मोठय़ा प्रमाणात रसायनांचा मारा त्वचेवर होत असतो. या रसायनांमुळे त्वचेवर वाईट परिणाम होतात. त्यामुळे भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग मंडळाने गाईच्या शेणापासून साबण बनविला आहे. मात्र या साबणाची किंमत इतर साबणाच्या तुलनेत जास्त आहे. साधारण साबण बाजारामध्ये ३० ते ४० रुपयाला मिळतो. तर हा शेणापासून बनलेला साबण १२५ रुपयांना मिळणार आहे.


या साबणाची खास गोष्ट म्हणजे याचा त्वचेवर कुठल्याच प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही. तर उलट ही साबण नेसर्गिकरीत्या त्वचा तजेलदार आणि सौम्य ठेवण्यास मदत करेल.

ABOUT THE AUTHOR

...view details