नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांची केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी भेट घेतली. यावेळी दोघांनी जखमींची विचारपूस केली. गुरु तेग बहादूर रुग्णालयात १५० पेक्षा जास्त जखमींवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीमध्ये तीन दिवसांच्या हिंसेनंतर शांतता प्रस्थापित होत आहे. हिंसाचार झालेल्या भागात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी जाफराबाद मेट्रो स्टेशनखाली बसलेल्या आंदोलकांना हटवले आहे. सीलमपूर, मौजपूर, भजनपुरा आणि गोकुलपूरी परिसरात सुरक्षा दल तैनात असून परिसरात शांतता आहे.