केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबेंची सरकारी अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तणूक - Baxar
चौबे यांच्या गाडीचा ताफा थांबवल्याने ते सरकारी अधिकाऱ्यांवर भडकले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून अश्लिल शब्दही वापरले.
केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे
पाटणा - केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बक्सर येथील सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट (एसडीएम) के.के.उपाध्याय यांच्याशी चौबे यांनी उद्धटपणे व्यवहार केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
उपाध्याय आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांनी चौबे यांच्या गाडीचा ताफा थांबवण्याची विनंती केली. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे उपाध्याय यांनी चौबेंना सांगितले. मात्र, चौबेंनी उपाध्याय यांचे काहीच ऐकले नाही. चौबेंची गाडी थांबवल्यानंतर त्यांनी अश्लिल शब्दांत सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
निवडणूक आयोगाचे आदेश असल्याने आम्हाला गाड्यांचा ताफा पुढे जाऊ देता येणार नाही, असे उपाध्याय यांनी चौबैंना सांगितले. यावर चौबेंनी भडकून अश्लिल शब्दात उत्तरे दिली. यावेळी चौबेंसोबत अनेक कार्यकर्ते होते.