पाटना (बिहार) - केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या परिवाराची भेट घेतली. येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसादांनी घेतली सुशांत कुमारच्या परिवाराची भेट लॉकडाऊननंतर पहिल्यांदा ते दोन दिवसीय दौऱ्यासाठी असताना शुक्रवारी येथे पोहोचले. पाटना येथे पोहोचल्यावर त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजूपत याच्या राजीव नगर येथील घरी भेट दिली. याठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली.
यावेळी प्रसाद यांनी सुशांतसोबत नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीची आठवण करून दिली. त्याला मला अभिमान आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रिय सुशांत, आभाळाला स्पर्श करण्याइतके सामर्थ असताना तु लवकर का गेलास? मला तुझ्यात भविष्यातील शाहरुख खान दिसत होता, असे मी तुझ्या वडिलांना आणि बहिणील सांगितले. तुझ्या जाण्याने संपूर्ण देशाला दु:ख झाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. याभेटीबद्दल प्रसाद यांनी ट्विट केले.
मंत्री प्रसाद यांच्यासोबत पाटलीपुत्रचे खासदार रामकृपाल यादव आणि दिघा विधानसभेचे आमदार संजीव चौरसिया उपस्थित होते.