महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'नागरिकत्व हिसकावण्याची एक तरतूद विरोधकांनी दाखवावी', अमित शाहांचे आव्हान - अमित शाह यांची कपिल सिब्बलवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

अमित शाह
अमित शाह

By

Published : Jan 12, 2020, 6:09 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे सभेला संबोधित करताना विरोधकांवर हल्लाबोल केला. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी सुधारित कायद्यात नागरिकत्व हिसकावण्याची तरतूद कुठेय ती दाखवून द्यावी, असे आव्हान शहा यांनी केले.

भारतावर जितका तुमचा आणि माझा अधिकार आहे. तितकाच अधिकार पाकिस्तानातून आलेल्या हिंदू शरणार्थींचा आहे. तुम्ही कितीही विरोध केला तरी, पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, आणि ख्रिश्चियन नागरिकांना मी भारतीय नागरिकत्व देणार आहे, असे शाह म्हणाले.काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यावरही शाह यांनी टीका केली. राम मंदिर नको व्हायला हवे, असे काँग्रेसचे वकील सिब्बल म्हणत आहेत. मात्र, येत्या 4 महिन्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर उभारल्या जाणार आहे. जर दम असेल थांबवून दाखवा, असे शाह म्हणाले. दिल्लीमधील जवाहरलाल विद्यापीठामध्ये काही जण भारत विरोधी घोषणा करत आहेत. 'भारताचे तुकडे-तुकडे व्हावे एक हजार, इंशाअल्लाह-इंशाअल्लाह', अशा घोषणा दिल्या. जी लोक देशविरोधी घोषणा देतील. त्यांना तुरुंगातच टाकले जाईल, असे शाह म्हणाले.


दरम्यान देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये आंदोलन सुरू आहेत.उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये सीएएविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यामध्ये अनेकांचा जीव गेला. सीएए कायद्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीक करत आहेत. तर सीएए' समर्थनार्थ भाजप अभियान राबवत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details