नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तीन तलाक विधेयक हे मुस्लीम महिलांच्या भल्यासाठी आण्यात आले असून विरोधकांनी राजकीय फायद्यासाठी त्याचा विरोध केला, असे अमित शाह एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
'तीन तलाक विधेयक बंद करण्याचे धाडस कोणामध्येच नव्हते'
इस्लामिक देशांनी तिहेरी तलाक पध्दत बंद केली. मात्र, आपल्याला ही पध्दत बंद करायला 56 वर्षे लागली. तीन तलाक बंद करने हे जर इस्लामाविरुद्द असते. तर इस्लामिक देशांनी हे गैर-इस्लामिक काम कशाला केले असते. देशातील इतर पक्षांना माहिती होते की, तिहेरी तलाक पध्दत ही मुस्लीम महिलांवर अन्याय करणारी आहे. तरीही ती बंद करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते, असा टोला शाह यांनी विरोधकांना लगावला.

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या साडेपाच वर्षांच्या कार्यकाळात 25 हून अधिक ऐतिहासिक निर्णय घेऊन देशाची दिशा बदलण्याचे काम केले आहे. तिहेरी तलाक रद्द करणे केवळ मुस्लीम समाजाच्या फायद्यासाठी आहे, असे ते म्हणाले. तीन तलक विधेयक हे केवळ मुस्लीम समुदायाच्या हितासाठी आहे. इतर कुठल्याही फायद्यासाठी नाही. हिंदू, ख्रिश्चन आणि जैन यांना याचा फायदा होणार नाही, कारण त्यांना या पद्धतीचा त्रास सहन करावा लागत नाही, असे शाह म्हणाले.